ग्रामपंचायत दोडी बु.

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

दोडी बु हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक महत्त्वाचे व सर्वांगीण विकास साधलेले गाव आहे. गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ५२८६ इतकी आहे, त्यात पुरुष – २७१५ आणि स्त्रिया – २५७१ आहेत. गावाचे एकूण क्षेत्रफळ २६९८ हेक्टर असून त्यामध्ये कोरडवाहू, बागायती, वनजमीन व गावठाणाचा समावेश आहे. गावात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय, बँक, पोस्ट ऑफिस, दूधसंस्था, पतसंस्था, तसेच विविध स्वयंसेवी संस्था व पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. गावामध्ये ८ अंगणवाड्या, १० प्राथमिक शाळा, १ माध्यमिक शाळा, १ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय आहे. येथे आरओ वॉटर फिल्टर, सांडपाणी शोषखडे, गटारी, घनकचरा व्यवस्थापन, तसेच सीसीटीव्ही, ई-लर्निंग सुद्धा प्राथमिक शाळांमध्ये उपलब्ध आहेत. शेती हा गावाचा मुख्य व्यवसाय असून येथे कांदे, टोमॅटो, गहू, बाजरी, मका, सोयाबीन अशी विविध पिके घेतली जातात. डाळिंब व अॅपल बोर या फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

ग्रामसेवक

श्री.भूषण एकनाथ लोहार

सरपंच

ज्योती नितीन भालेराव

उपसरपंच

साहेबराव रभाजी शिंदे

सदस्य

अंकिता गणेश वाघ

सदस्य

दत्तू मुरलीधर दराडे

सदस्य

सविता शंकर आव्हाड

सदस्य

कमल मनोहर माळी

सदस्य

सुखदेव बाबुराव आव्हाड

सदस्य

जयश्री कैलास जाधव

दोडी बु २०११ च्या जनगणनेचा तपशील

🟩 गावाची सर्वसाधारण माहिती – दोडी बु (ता. सिन्नर, जि. नाशिक)

घटकमाहिती
गावाचे नावदोडी बु
तालुका / जिल्हासिन्नर / नाशिक
एकूण लोकसंख्या५२८६ (पुरुष – २७१५, स्त्रिया – २५७१)
घरांची संख्यापक्की – ७००, कच्ची – ३५०
गावाचे एकूण क्षेत्रफळ२६९८ हेक्टर
गावठाण क्षेत्र२०० हेक्टर
शेतजमीन२४९८ हेक्टर (कोरडवाहू – ७१६, बागायती – १२००, पडीत – ३००)
वनजमीन२०२.५१ हेक्टर
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीगायरान – होय, मैदान – होय, आठवडे बाजार – होय, व्यावसायिक गाळे – खाजगी
शासकीय कार्यालयेतलाठी कार्यालय (चावडी), ग्रामपंचायत कार्यालय, बँक, पोस्ट ऑफिस
आरोग्य सुविधा१) ग्रामीण रुग्णालय (३० खाटांचे)
२) उपकेंद्र
३) ३ खाजगी दवाखाने
४) पशुवैद्यकीय दवाखाना
शैक्षणिक व प्रशिक्षण सुविधा
  • अंगणवाड्या – ८
  • प्राथमिक शाळा – जि.प. शाळा दोडी बु, शिंदेवाडी, केदारवाडी, म्हाळोबा वस्ती, लावरेवाडी, दत्तवाडी, उगलेवाडी
  • माध्यमिक शाळा – श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ
  • कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय – ब्रह्मानंद स्वामी न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनिअर कॉलेज (आर्ट, कॉमर्स, सायन्स)
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था१) १६ गाव नळ पाणी योजना
२) विहिरी
३) आरओ वॉटर फिल्टर
सांडपाणी व्यवस्थापनगटारी – होय, शोषखडे – होय
घनकचरा व्यवस्थापनहोय (स्थापित प्रणालीद्वारे)
महत्त्वाचे धार्मिक स्थळेश्री म्हाळोबा मंदिर, विठ्ठल मंदिर, साई मंदिर, ब्रह्मानंद स्वामी समाधी मंदिर
वार्षिक उत्सवश्री म्हाळोबा यात्रा (श्रावण व माघ पौर्णिमा), निवृत्तीनाथ पालखी मुक्काम
महत्त्वपूर्ण उपक्रम (लोकसहभागातून)पाणी वापर संस्था, विहीर पुनर्भरण, शोषखडे, शेतकरी गट व अ‍ॅग्री कंपनी, व्यापारी संकुल
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला ५ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ अ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला २० दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी