ग्रामपंचायत दोडी बु.

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

🌱गावामध्ये विविध उपक्रम राबवले आहेत

आरओ फिल्टर

47

दोडी बु गावात ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने आरओ वॉटर फिल्टर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेतून गावातील नागरिकांना योग्य दरात गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा केला जातो. आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली ही सुविधा संपूर्ण गावासाठी उपयुक्त ठरते.

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

46

दोडी बु येथील बाजारपेठेचा विकास साधण्यासाठी स्व. लोकनेते गोपीनाथ मुंढे व्यापारी संकुल उभारण्यात आले असून त्यामध्ये ६२ व्यापारी गाळे तयार करण्यात आले आहेत. हे गाळे स्थानिक उद्योजक व दुकानदारांना दिले जात असून, त्यामुळे स्थानिक आर्थिक विकासास चालना मिळाली आहे.

बुद्धविहार

48

गावामध्ये बौद्ध समाजाच्या सांस्कृतिक व धार्मिक उपासनेसाठी सुंदर अशा बुद्धविहाराची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम, ध्यानधारणा व बौद्ध धर्माचे उपदेश यांचे आयोजन केले जाते. बुद्धविहार हे गावातील सामाजिक सौहार्दाचे प्रतीक आहे.

सि सि टी व्ही सुविधा

37

दोडी बु येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV प्रणाली बसविण्यात आली आहे. शाळेमध्ये ६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, यामुळे शाळेतील शिस्त, नियंत्रण व सुरक्षा यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. शाळेमध्ये इ-लर्निंगसाठी संगणक व डिजिटल शिक्षणाचीही सुविधा आहे.

ध्यान केंद्र

44

दोडी बु गावाला श्री ब्रह्मानंद स्वामी महाराज यांचा सहवास लाभला आहे. त्यांची समाधी दोडी बु मध्ये असून, येथे सुंदर असे ध्यान केंद्र बांधण्यात आले आहे. हे केंद्र शांती, ध्यान व आत्मिक साधनेसाठी ग्रामस्थ व भाविकांसाठी एक उत्कृष्ट स्थान आहे.

पशुवैद्यकीय दवाखाना

40

दोडी बु गावात शेतीबरोबरच पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरज लक्षात घेता येथे पशुवैद्यकीय दवाखाना स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी गुरांचे उपचार, लसीकरण, तपासणी व पशुधन आरोग्य शिबिरे घेतली जातात.